

Post Office RD Scheme: Save Just ₹200 a Day and Build a ₹4.30 Lakh Fund
eSakal
Post Office RD Scheme: आपण भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करतो. त्यात जर तुम्हाला दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम बाजूला ठेवून मुलीच्या भविष्यासाठी चांगला निधी तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट(RD) योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करून ठरावीक कालावधीनंतर व्याजासह पैसे मिळतात. सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर मिळत आहे.