

Post Office Scheme: Earn ₹61,000 Monthly and Build a ₹1 Crore Fund With This Investment Strategy
esakal
Post Office Investment: रिटायरमेंटनंतर लोकांचे नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारे नियमित उत्पन्न बंद होते. मात्र त्याचवेळी महागाई वाढत असल्याने बचत केलेल्या पैशांवरही भविष्यातील खर्च भागवण्याचा दबाव वाढतो. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी तरुण वयापासूनच पैशाचे योग्य नियोजन करून दीर्घकालीन गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते.
त्यामुळे रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत कायम राहावा यासाठीच पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF योजना हा एक उत्तम पर्याय आहे. दीर्घकाळ केलेली गुंतवणूक आणि चक्रवाढीचा फायदा घेतल्यास तुम्ही यातून मोठा रिटायरमेंट फंड तयार करू शकतात.