

PPF Investment Explained: Is Public Provident Fund Still Worth It for Tax Saving in 2026?
eSakal
PPF Investment Strategy: मार्च महिना सुरू झाला की बहुतेक नोकरी करणाऱ्या लोकांसमोर एकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे टॅक्स कसा वाचवायचा? ऑफिसकडून HR चा मेल येतो आणि अनेकजण घाईघाईत आपली बचत पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवतात. सरकारी हमी आणि करसवलत मिळत असल्यामुळे हा पर्याय लोकप्रिय आहे. मात्र 2026 मध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना PPF सर्वांसाठी योग्य आहे का, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.