
PRS Oberoi Passes Away: ओबेरॉय समूहाचे अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांचे आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. भगवंती ओबेरॉय चॅरिटेबल ट्रस्ट, ओबेरॉय फार्म, कापशेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कंपनीने सांगितले की ओबेरॉय ग्रुपमधील किंवा पीआरएस ओबेरॉय यांना ओळखणारा कोणीही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतो. ग्रुपच्या सर्व हॉटेल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्येही त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
पीआरएस ओबेरॉय हे भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ओळखले जात होते. PRS ओबेरॉय यांनी 2022 मध्ये EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
आलिशान हॉटेल्सच्या जगात भारताला शिखरावर नेणारी व्यक्ती म्हणजे PRS ओबेरॉय. वडील सरदार मोहन सिंग ओबेरॉय यांच्यासोबत त्यांनी ओबेरॉय हॉटेल आणि रिसॉर्ट ब्रँडची स्थापना केली. आर्थिक उदारीकरणापूर्वी, जेव्हा भारतातील काही कॉर्पोरेट ब्रँड जसे की टाटा, गोदरेज, महिंद्रा देशाबाहेर ओळखले जात होते, तेव्हा ओबेरॉय हॉटेलने भारतात आणि भारताबाहेरही एक चांगली ओळख निर्माण केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.