Ivan Menezes: पुण्यात जन्मलेल्या जगातील सर्वात मोठ्या मद्य कंपनीचे CEO इवान मेनेजेस यांचे निधन|Pune-born Diageo CEO Ivan Menezes, the 64-year old IIT Ahmedabad alumnus, passes away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ivan Menezes Passes Away

Ivan Menezes: पुण्यात जन्मलेल्या जगातील सर्वात मोठ्या मद्य कंपनीचे CEO इवान मेनेजेस यांचे निधन

Ivan Menezes Passes Away: जगातील सर्वात मोठी आणि महागडी मद्य कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इवान मैनुअल मेनेजेस यांचे बुधवारी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

या महिन्याच्या अखेरीस ते निवृत्ती घेणार होते. त्यांचे वय 64 वर्षे होते. मेनेजेस यांना पोटाच्या अल्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लंडनमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण लगेच समजू शकले नाही. मेनेजेस यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डियाजिओने सोमवारी दिली होती. त्यांच्या जागी डेब्रा क्रू यांना सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

डियाजिओने एका निवेदनात म्हटले आहे की, आठवड्याच्या शेवटी असे सांगण्यात आले होते की अल्सर शस्त्रक्रिये नंतर मेनेजेस यांची प्रकृती बरी होत नव्हती.

पुण्यात जन्मलेले मेनेजेस, ज्यांचे वडील मैनुअल मेनेजेस भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज आणि IMM, अहमदाबाद येथे शिक्षण घेतले.

1997 मध्ये ते डिएजिओमध्ये सामील झाले. ते जुलै 2012 मध्ये कार्यकारी संचालक आणि जुलै 2013 मध्ये सीईओ बनले. त्यांना 2023 मध्ये नाइट ही पदवी देण्यात आली.

जॉनी वॉकर व्हिस्की यांनी 28 मार्च रोजी मेनेजेसच्या जागी क्रूच्या नियुक्तीची घोषणा केली होती. कंपनीने यावेळी सांगितले की, इवान यांच्या कार्यकाळात डियाजिओने मोठी प्रगती केली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, प्रीमियम ड्रिंक्समध्ये ते जागतिक आघाडीवर आहे.

डियाजिओ 200 हून अधिक ब्रँड्स विकते:

डियाजिओ आता 180 हून अधिक बाजारपेठांमध्ये 200 हून अधिक ब्रँड विकते. स्कॉच व्हिस्की, वोडका, जिन, रम, कॅनेडियन व्हिस्की, लिकर्स आणि टकीला मध्ये निव्वळ विक्री मूल्यानुसार डियाजिओ आज नंबर एक कंपनी आहे. कंपनीने अवघ्या 8 वर्षात हे स्थान मिळवले आहे.

इव्हान यांची जुलै 2013 मध्ये डियाजिओचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इव्हान मॅनेजेस हे स्कॉच व्हिस्की असोसिएशन कौन्सिलचे अध्यक्ष देखील होते.

ते टेपेस्ट्रीचे कार्यकारी संचालक, केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य, मूव्हमेंट टू वर्कचे विश्वस्त आणि आंतरराष्ट्रीय अलायन्स फॉर रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंगचे सदस्य देखील होते.

टॅग्स :Pune Newscompanydeath