
रघुराम राजन यांनी भारताला ‘पुढचा चीन’ होण्याचा विचार सोडून देऊन सेवाक्षेत्र आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन आणि राष्ट्रवादामुळे कमी कौशल्य असणाऱ्या नोकऱ्या कमी होत आहेत, त्यामुळे केवळ मॅन्युफॅक्चरिंगवर अवलंबून राहणं धोकादायक ठरेल.
भारताने उच्च मूल्य सेवा आणि लॉजिस्टिक्स, ट्रक ड्रायव्हिंग, प्लंबिंगसारख्या कमी कौशल्याच्या सेवांना चालना देऊन नोकऱ्या निर्माण कराव्यात.
Raghuram Rajan Warns India: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राजन यांनी स्पष्ट केलं आहे की, भारताने उत्पादन क्षेत्रात ‘पुढचा चीन’ होण्याची महत्वाकांक्षा ठेवण्याऐवजी सेवाक्षेत्र आणि कौशल्य विकासावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं.