Rahul Gandhi: शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक पण एकही कार मालकीची नाही; राहुल गांधींची संपत्ती किती?

Rahul Gandhi Portfolio: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून काही जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरला आहे.
Rahul Gandhi Portfolio
Rahul Gandhi PortfolioSakal

Rahul Gandhi Portfolio: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून काही जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरला आहे.

त्यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 24 कंपन्यांचे स्टॉक आहेत ज्यांचे मूल्य सध्या 4.4 कोटी रुपये आहे. पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्समध्ये त्यांची सर्वात जास्त गुंतवणूक आहे ज्यात 40 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आहे. याशिवाय राहुल गांधींनी गोल्ड बाँड आणि पीपीएफ इत्यादींमध्येही गुंतवणूक केली आहे.

राहुल गांधींची एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टायटन, एचयूएल आणि आयसीआयसीआय बँकेतही गुंतवणूक आहे. राहुल गांधींनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आहे. राहुल गांधींनी आयटी, आरोग्यसेवा, औद्योगिक आणि वित्तीय क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवले आहेत. निफ्टी - LTIMindtree, Infosys आणि TCSसह 6 सॉफ्टवेअर कंपन्यांच्या स्टॉकमध्ये एकूण 42 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

स्टॉक्सव्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या 52 नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) मध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय, HDFC AMC, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि PPFAS म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत.

राहुल गांधी यांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 3.81 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे 4 लाखांचे सोन्याचे दागिने आहेत तसेच हरियाणातील गुरुग्राम मध्ये 9 कोटी रुपये किमतीचे कार्यालय आहे. राहुल गांधी यांच्याकडे एकही कार नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

Rahul Gandhi Portfolio
RBI Guidelines: EMI भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा! कर्जाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू

राहुल गांधी यांच्याकडे 55 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. याशिवाय बँक खात्यात 26.25 लाख रुपये, डिबेंचर्समध्ये 1.90  लाख रुपये आणि गोल्ड बाँडमध्ये 15.21 लाख रुपये आहेत. पोस्टल बचत, विमा आणि पीपीएफमध्ये 61.52 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

राहुल गांधी यांच्याकडे एकूण 9,24,59,264 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपये आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये इतकी आहे.

मात्र, राहुल गांधी यांच्यावर सुमारे 49,79,184 रुपयांची देणी आहेत. राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये होती.

Rahul Gandhi Portfolio
ITR Forms: करदात्यांसाठी मोठी बातमी; आयकर विभागाने 3 फॉर्म केले जारी, तुमच्यासाठी कोणता फॉर्म योग्य?

2019 मध्ये एवढी संपत्ती होती

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते, त्यावेळी त्यांच्यावर 72 लाखांचे कर्जही होते. गेल्या 5 वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटींची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com