
इंडसइंड बँकेच्या आर्थिक गोंधळानंतर CEO सुमंत कठपालिया यांनी राजीनामा दिला होता.
त्यांच्या जागी आता राजीव आनंद यांची CEO म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या अनुभवामुळे बँकेच्या शेअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
IndusInd Bank Share: इंडसइंड बँकेभोवती मागील काही महिन्यांपासून संकटांची मालिका सुरू होती. आर्थिक गोंधळ, CEO चा राजीनामा, डेरिव्हेटिव्हमध्ये मोठा तोटा आणि शेअर्समध्ये मोठी पडझड… हे सर्व घडत असतानाच आता बँकेसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राजीव आनंद यांची इंडसइंड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाली आहे.
25 ऑगस्ट 2025 पासून 24 ऑगस्ट 2028 पर्यंत तीन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मंजुरी मिळाल्यानंतर ही नेमणूक निश्चित करण्यात आली आहे.