
Ram Mandir Online Prasad Fraud: श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भाविकांना ऑनलाईन प्रसाद पाठवण्याच्या नावाखाली 4 कोटींहून अधिक रुपयांच्या सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी khadiorganic.com नावाची वेबसाइट तयार केली होती आणि लाखो भाविकांनी यावर नोंदणी केली होती. अयोध्या सायबर गुन्हे पोलिस स्टेशनच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.