
Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गेल्या पाच वर्षांत सरकारला सुमारे 400 कोटी रुपये कर म्हणून दिले आहेत. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ही रक्कम 5 फेब्रुवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत देण्यात आली आहे. 400 कोटी रुपयांपैकी 270 कोटी रुपये जीएसटी म्हणून देण्यात आले, तर उर्वरित 130 कोटी रुपये कराच्या स्वरुपात देण्यात आले आहेत.