Ratan Tata: त्या केवळ अफवा...क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीवर रतन टाटांचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

टाटा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांच्या बाजूने हे स्पष्टीकरण आले आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal

Ratan Tata On Cryptocurrency: टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणत्याही स्वरूपात क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. टाटा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांच्या बाजूने हे स्पष्टीकरण आले आहे.

रतन टाटा यांनी ट्विट करून सांगितले आहे की, त्यांचा कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीशी काहीही संबंध नाही. टाटा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "क्रिप्टोकरन्सीशी माझ्या संबंधाविषयी कोणताही लेख किंवा जाहिरात तुम्ही पाहिल्यास, त्या पूर्णपणे खोट्या आहेत आणि त्यांचा उद्देश लोकांना फसवणे आहे."

यापूर्वी, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या खोट्या बातम्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे बँकांमध्ये भीती पसरली असून तज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत, असे म्हटले होते.

एक अहवाल समोर आला होता की त्यांना कमाईचे असे साधन सापडले आहे जे गुंतवणूकदारांना 3 ते 4 महिन्यांत करोडपती बनवेल. नंतर आनंद महिंद्रा यांनीही स्पष्टीकरण जारी केले की त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाही गुंतवला नाही असे सांगितले.

Ratan Tata
HDFC Merger: HDFC चे होणार विलीनीकरण! कराेडो ठेवीदार अन् गृहकर्ज ग्राहकांवर काय परिणाम होणार?

क्रिप्टोकरन्सीबाबत जगातील अनेक तज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. वॉरेन बफेने बिटकॉइनला जुगाराचे टोकन म्हणत त्यांनी क्रिप्टोकरन्सी नाकारली आहे.

सरकारने अद्याप भारतात क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. पण गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी वर 30 टक्के कर लावण्यात आला होता, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर एक टक्का टीडीएसची तरतूदही लागू करण्यात आली आहे.

क्रिप्टोबद्दल गुंतवणूकदारांची वेगवेगळी मते

मालमत्ता वर्ग म्हणून क्रिप्टोकरन्सीबाबत गुंतवणूकदारांची मते वेगवेगळी आहेत. वॉरेन बफे आणि चार्ली मुंगेर सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी अनेक वेळा डिजिटल चलनाच्या शक्यता नाकारल्या आहेत.

बफे यांनी बिटकॉइनचे वर्णन 'जुगार टोकन' असे केले आहे. त्याचवेळी मंगर म्हणाले होते की, कोणीही ते विकत घेईल हे हास्यास्पद आहे.

Ratan Tata
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com