Ration Card Vivran Status : रेशनकार्ड यादीतून २.५ कोटी लोकांची नावे वगळली, तुमचं तर नाव नाही ना? २ मिनिटांत असं करा चेक

Ration card status : सहा महिन्यांपासून रेशन न घेणाऱ्या किंवा चुकीच्या माहितीवर कार्ड मिळवलेल्या कुटुंबांवर कारवाई होत आहे. रेशन कार्डासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
Ration card holders checking their name status online through the NFSA portal to confirm eligibility and e-KYC update.

Ration card holders checking their name status online through the NFSA portal to confirm eligibility and e-KYC update.

esakal

Updated on

Summary

  1. सरकारने अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशनकार्ड यादीतून मोठ्या प्रमाणावर वगळण्यास सुरुवात केली आहे.

  2. मृत व्यक्तींच्या नावावर रेशन मिळत असल्याच्या तक्रारींमुळे पडताळणी प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे.

  3. गेल्या काही महिन्यांत सुमारे २.२५ कोटी नावे मोफत रेशन योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत.

Ration Card Check Online : देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. अशा गरीबल आणि गरजू लोकांना दोन वेळचे जेवणही कधी मिळत नाही. यासाठी भारत सरकार त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन पुरवते. पण हे अनुदानित रेशन मिळविण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. नुकतेच रेशन कार्डमधून मोठ्या प्रमाणात नावे काढून टाकल्याच्या बातम्या आल्या आहेत. सरकार पात्र नसलेल्या परंतु तरीही कार्डचा लाभ घेत असलेल्या लोकांची नावे वगळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com