LIC MF : एलआयसी एमएफ पोहोचेल १ लाख कोटीवर; रवीकुमार झा यांचा दावा

Ravi Kumar Jha : गुंतवणूकदारांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून त्यांच्या संपत्तीनिर्मिती आणि वाढीसाठी आम्ही चांगल्या योजना बाजारात आणत आहोत.
LIC MF
LIC MFSakal
Updated on

मुंबई : सातत्यपूर्ण कामगिरी, वितरकांना महत्त्व देणे, कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे, शाखाविस्तार आणि डिजिटायझेशन यांच्या आधारावर एलआयसी म्युच्युअल फंडाची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) दोन वर्षांतच एक लाख कोटीवर पोचेल, असा विश्वास एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार झा यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.

गुंतवणूकदारांचा विश्वासार्ह भागीदार म्हणून त्यांच्या संपत्तीनिर्मिती आणि वाढीसाठी आम्ही चांगल्या योजना बाजारात आणत आहोत. सध्या आमची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ३४ हजार कोटी रुपयांची आहे.

दरवर्षी ५० टक्के व्यवसायवृद्धीची आम्हाला अपेक्षा आहे. व्यवसायवाढीसाठी म्युच्युअल फंड वितरकांवर आमचा भर आहे. त्यासाठी एलआयसीच्या विमा एजंटांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून ८० टक्के व्यवसाय मिळेल, असा प्रयत्न आहे.

या वितरकांकडून आलेले ग्राहक दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी टिकतात. कारण वितरक हा आर्थिक सल्लागार म्हणूनही आपल्या ग्राहकांना टिकवून धरतो. तो त्यांना मार्गदर्शन करून दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदेही सांगतो. ‘एसआयपी’च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास सर्वजण यशस्वी होतील. निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठीही आम्ही ‘एफडी’पेक्षा जास्त दराने परतावा देणाऱ्या योजनांसाठी प्रयत्नशील आहोत, असेही झा म्हणाले.

शाखाविस्तारावर भर

भारतात आमच्या ३६ शाखा असून, यावर्षी ही संख्या ५० करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर, वाशी येथेही आम्ही शाखा उघडल्या आहेत. डिजिटायझेशनच्या युगातही प्रत्यक्ष शाखेत अधिकाऱ्यांशी बोलल्याने ग्राहकांना व्यवस्थित माहिती मिळते आणि त्यांचा विश्वास वाढतो. या सर्व उपाययोजनांच्या आधारे आम्ही आमची मालमत्ता वाढवून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देऊ शकू, असेही झा यांनी सांगितले.

LIC MF
LIC: एलआयसी विकणार मुंबईसह 'या' शहरांमधील मालमत्ता; कंपनीवर ही वेळ का आली?

‘अॅप’द्वारे सहज गुंतवणूक

चांगले कुशल कर्मचारी हे म्युच्युअल फंड उद्योगाची अमूल्य संपत्ती आहेत. त्यामुळे आमच्या कुशल कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम आणले आहेत. आमच्या वेबसाईटची पुनर्रचना करतानाच गुंतवणूकदार व वितरकांसाठी ‘अॅप’ आणले असून, त्याद्वारे गुंतवणूक सहजसोपी होईल, असेही झा म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.