
RBI Approves HDFC Bank's Acquisition: एचडीएफसी बँकेला तीन बँकांमधील हिस्सेदारी विकत घेण्यासाठी आरबीआयकडून मंजुरी मिळाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला 9.5 टक्क्यांपर्यंत हिस्सा घेण्यास RBI कडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. एचडीएफसी बँकेने शुक्रवारी रात्री सांगितले की, सेंट्रल बँकेने 3 बँकांमधील 9.50 टक्के भागभांडवल घेण्यास मान्यता दिली आहे.