RBI asks banks to submit data on gold loan frauds doubts of system manipulation
RBI asks banks to submit data on gold loan frauds doubts of system manipulationSakal

Gold Loan: गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBIने घेतली कठोर भूमिका; बँकांकडून मागवली माहिती, काय आहे प्रकरण?

Data on Gold Loan Fraud: पेटीएम आणि आयआयएफएलवरील कारवाईनंतर रिझर्व्ह बँकेची भूमिका आणखी कडक झाली आहे. गोल्ड लोन प्रकरणात आरबीआयने फसवणुकीबाबत आपली भूमिका कठोर केली आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना गोल्ड लोन फसवणूक प्रकरणात आवश्यक माहिती देण्यास सांगितले आहे.

Data on Gold Loan Fraud: पेटीएम आणि आयआयएफएलवरील कारवाईनंतर रिझर्व्ह बँकेने कठोर भूमिका घेतली आहे. गोल्ड लोन प्रकरणात आरबीआयने फसवणुकीबाबत माहिती मागवली आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना गोल्ड लोन फसवणूक प्रकरणात आवश्यक माहिती देण्यास सांगितले आहे. (RBI asks banks to submit data on gold loan frauds doubts of system manipulation)

गोल्ड लोन हे सहज उपलब्ध होणारे कर्ज आहे, अशा परिस्थितीत बरेच लोक ते परत करत नाहीत, ज्यामुळे बँकेचे नुकसान होते. आता या गोल्ड लोन फसवणूक प्रकरणाबाबत, आरबीआयने बँकांना फसवणूक, पोर्टफोलिओमधील डिफॉल्ट आणि पैसे वसूल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यास सांगितले आहे.

बँकांना कोणत्या सूचना मिळाल्या आहेत?

ET च्या अहवालानुसार, गोल्ड लोनशी संबंधित माहिती विचारण्याव्यतिरिक्त, रिझर्व्ह बँकेने बँकांना इतर सूचना देखील दिल्या आहेत. बँकांना त्यांच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे, जेणेकरून बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या पॅरामीटर्सनुसार आहे की नाही हे कळू शकेल.

RBI asks banks to submit data on gold loan frauds doubts of system manipulation
Jet Airways : जेट एअरवेजची मालकी ‘जालान कॅलरॉक’कडे; ‘एनसीएलएटी’च्या खंडपीठाचा निर्णय

'या' प्रकरणामुळे मागवला डेटा

सोन्याच्या कर्जाच्या बाबतीत बँक कर्मचारी यंत्रणेशी छेडछाड करत असल्याची भीती आरबीआयला वाटते. अशी काही प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत.

अलीकडेच दोन सरकारी बँकांशी संबंधित अशी प्रकरणे उघडकीस आली, ज्यात बँक कर्मचाऱ्यांनी गोल्ड लोनचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी यंत्रणेशी छेडछाड केली.

दोन्ही प्रकरणे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने बँकांकडून डेटा मागवला आहे. एका वरिष्ठ बँकेच्या अधिकाऱ्याचा हवाला देत अहवालात असे म्हटले आहे की रिझर्व्ह बँक स्वतःहून गोल्ड लोन डेटा देखील अॅक्सेस करू शकते. (RBI asks for info on gold loan frauds)

अशा प्रकारे केली फसवणूक

अलीकडेच रिझर्व्ह बँकेला काही बँकांमधील गोल्ड लोनच्या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत माहिती मिळाली होती. अशा प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी काही ग्राहकांशी संगनमत करून त्यांना तारण न घेता गोल्ड लोन दिले.

RBI asks banks to submit data on gold loan frauds doubts of system manipulation
Stock Market: मोठी बातमी! NSE ने घेतला मोठा निर्णय; आता शेअर्सची खरेदी-विक्री होणार आणखी स्वस्त

म्हणजेच सोने गहाण न ठेवता लोकांना गोल्ड लोन देण्यात आले. काही वेळाने ग्राहकांकडून संपूर्ण पैसे भरण्यात आले. या प्रकरणांमध्ये, कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रक्रिया शुल्क बँकेच्या खर्चाच्या खात्यातूनच भरले, तर व्याजाच्या भरणामध्ये हेराफेरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com