

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम (ATM) आणि पॉइंट ऑफ सेल (PoS) टर्मिनलद्वारे रोख रक्कम काढण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेले हे नवीन 'मास्टर डायरेक्शन' त्वरित प्रभावाने लागू झाले आहे. या निर्देशांमध्ये मोफत एटीएम व्यवहारांची संख्या, अतिरिक्त शुल्क, अयशस्वी व्यवहार आणि पीओएस टर्मिनलवरून पैसे काढण्याच्या मर्यादेबाबत महत्त्वाचे बदल स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे एटीएमचा नियमित वापर करणाऱ्या ग्राहकांनी हे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा