
RBI Cancels License
Sakal
Bank Licence Cancel: सातारा येथे असलेल्या ‘जीजामाता महिला सहकारी बँके’वर आता कायमचे कुलूप लागले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बँकेचा परवाना रद्द केला असून तिच्या सर्व बँकिंग सेवा थांबवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे हजारो खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत आणि ते स्वतःच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत.