
RBI Repo Rate Cut: सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. महागाई दर सध्या सरासरी 4% पेक्षा कमी असल्याने रेपो दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ-संबंधित निर्णयांमुळे जागतिक अनिश्चितता कायम आहे. 4 जूनपासून रिझर्व्ह बँकेची समिती या विषयावर चर्चा करेल आणि 6 जून रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल.