

Reserve Bank of India: गुरुवारी दुपारी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला आहे. रशियन भाषेत लिहिलेल्या ईमेलमध्ये सेंट्रल बँक उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.