RBI directives stop PhonePe rent payment feature
esakal
After RBI’s new payment aggregator rules, PhonePe and CRED have stopped rent payments via credit cards : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट अॅग्रीगेटर संदर्भात दिलेल्या नव्या निर्देशांनंतर आता फोनपे, क्रेडसारख्या अॅपने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील रेंट पेमेंटची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्डवरून पैसे पाठवता येत नसून त्याचा थेट परिणाम भाड्याने राहणाऱ्या लोकांवर होतो आहे. यापूर्वी अनेकजण रेंट पेमेंटच्या पर्यायाचा वापर करत क्रेडीट कार्डवरून घरमालकाला पैसे पाठवत होते. मात्र, आता त्यांना हे पैसे पाठवताना अडचणी येत आहेत.