RBI Penalty: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! 10 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Penalty on Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 10 बँकांवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना 60 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.
RBI Penalty on Banks
RBI Penalty on BanksSakal

RBI Penalty on Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 10 बँकांवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना 60 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता याचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या बँकांमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील बँकांचा समावेश आहे. या बँकांवर दंड आकारण्याबाबत आरबीआयने 26 आणि 27 मार्च रोजी निवेदन जारी केले होते. कोणत्या 10 बँकांना किती दंड ठोठावला आहे ते जाणून घेऊया.

सोलापूर जनता सहकारी बँक, सोलापूर (महाराष्ट्र)

आरबीआयने सोलापूर जनता सहकारी बँकेला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी आरबीआयने केली होती.

जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक (महाराष्ट्र)

RBI ने जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला 59.90 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. सहकारी बँका अंतर्गत विशिष्ट आदेशाचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. मर्यादेपेक्षा अधिक कर्जे बँकेच्या नाममात्र सदस्यांना दिली होती.

स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, औरंगाबाद (महाराष्ट्र)

RBI ने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांनुसार निधीच हस्तांतरण केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. RBI ने 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत तपासणी केली होती.

उत्कृष्ट सहकारी बँक, मुंबई (महाराष्ट्र)

निधीशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईस्थित उत्कृष्ट सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी आरबीआयने केली होती.

हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, हावडा (पश्चिम बंगाल)

आरबीआयने हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेच्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) कडून बँकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यात आली.

राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, राजापालयम (तामिळनाडू)

राजपालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला संचालक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना दिलेली कर्जे आणि ॲडव्हान्स यांच्या संदर्भात RBI निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 75,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत तपासणी केली होती.

RBI Penalty on Banks
PPF Investment: पीपीएफ खात्यात 5 एप्रिलपूर्वी करा गुंतवणूक; अन्यथा होऊ शकते हजारोंचे नुकसान

मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, हिमाचल प्रदेश

भारतीय रिझर्व्ह बँकेने हिमाचल प्रदेशातील मंडी येथील मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली होती.

चिक्कमगलुरु जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड, चिक्कमगलुरू, कर्नाटक

RBI ने या बँकेला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाबार्डच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने नाबार्डला वेळेवर अहवाल दिला नाही. 31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी नाबार्डने केली होती.

RBI Penalty on Banks
IIT Bombay: धक्कादायक! आता IIT मध्येही नोकरीची गॅरंटी नाही; 36 टक्के विद्यार्थी नोकरीपासून वंचित

दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दिंडीगुल, तामिळनाडू

RBI ने या बँकेला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने नाममात्र सभासदांना विहित मर्यादेपेक्षा जास्त कर्ज मंजूर केले. RBI ने 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत तपासणी केली होती.

मथुरा जिल्हा सहकारी बँक, उत्तर प्रदेश

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949च्या काही कलमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने मथुरा जिल्हा सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 अन्वये स्थावर मालमत्तेची विल्हेवाट न लावल्याचा बँकेवर आरोप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com