

RBI Authentication Guidelines 2025
Sakal
RBI Authentication Guidelines 2025: डिजिटल पेमेंट्समध्ये मोठा बदल होणार आहे. ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढत असताना फसवणुकीचाही धोका वाढत आहे. ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. RBI ने “Authentication Mechanisms for Digital Payment Transactions Directions, 2025” नावाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे.