

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय पतधोरण बैठकीचे निकाल आज 7 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले आहेत. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीचा निर्णय जाहीर केला.
अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली आहे. यावेळी RBIने 25 बेसिक पॉइंट्स (0.25%) पर्यंत रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे तुमच्या कर्जावर परिणाम होईल आणि ईएमआयचा बोजा कमी होईल.