
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जावर परिणाम होणार आहे.
जागतिक आर्थिक दबाव व GDP ग्रोथला चालना देण्यासाठी RBIने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
RBI MPC Meeting August 2025 Live Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मॉनेटरी पॉलिसी कमिटीचा (MPC) अहवाल सादर केला आहे. फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या दरकपातींच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे होम लोन आणि कार लोनचा EMI तसाच राहणार आहे. गेल्या वेळच्या बैठकीत MPC ने 50 बेसिस पॉइंट्सनी कपात करत रेपो रेट 5.50% केला होता.