
Home Loan Interest Rate Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण बैठकीचे निकाल जाहीर झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणे आणि एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींसारख्या जागतिक आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, रेपो दरात कपात करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी रेपो दर 0.25% ने कमी करून 6 % केला आहे. बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये घट झाल्याने कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्याने ईएमआय वाढतो.