
RBI MPC Meeting Updates: कर्ज घेणाऱ्या किंवा ईएमआय भरणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी रेपो दरात कपात केली आहे. 4 जूनपासून सुरू झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) दोन दिवसांच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्क्यांची मोठी कपात जाहीर केली. त्यानंतर आता रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे.