RBI Campaign: RBIची 100 दिवस 100 पे मोहीम सुरू, SBI कडे आहेत सर्वात जास्त दावा न केलेल्या ठेवी |RBI started 100 Days 100 Pays campaign, maximum unclaimed deposits with SBI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI Campaign

RBI Campaign: RBIची 100 दिवस 100 पे मोहीम सुरू, SBI कडे आहेत सर्वात जास्त दावा न केलेल्या ठेवी

RBI Started 100 Days 100 Pays Campaign: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज '100 दिवस 100 पे' मोहीम सुरू केली आहे. बँकांमध्ये दावा न केलेला पैसा म्हणजेच दावा न केलेल्या ठेवी गोळा करून त्यांची सेटलमेंट करण्याचा हा कार्यक्रम आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 12 मे रोजी 100 दिवस 100 पे मोहिमेची घोषणा केली. या अंतर्गत, 100 दिवसांच्या आत, भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेत जमा केलेल्या 100 हक्क नसलेल्या ठेवी शोधून त्यांची सेटलमेंट केली जाईल.

बँकिंग सिस्टीममध्ये दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या मालकांना/दावेदारांना अशा ठेवी परत करण्यासाठी RBI ही मोहीम हाती घेत आहे.

दावा न केलेली ठेव म्हणजे काय?

त्या ठेवीवर 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणतीही क्रिया (ठेवी किंवा पैसे काढणे) नसल्यास ठेव दावा न केलेली मानली जाते. त्यानंतर बँका अशा ठेवी आरबीआयने तयार केलेल्या "डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस" (DEA) फंडमध्ये हस्तांतरित करते.

आतापर्यंत 35 कोटींहून अधिकच्या हक्क न केलेल्या ठेवी:

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 35,012 कोटी रुपयांची रक्कम आरबीआयकडे हस्तांतरित केली आहे.

SBI कडे सर्वाधिक दावा न केलेल्या ठेवी:

सध्या, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये दावा न केलेल्या ठेवींची संख्या सर्वाधिक आहे. SBI कडे 8,086 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक (PNB) आहे ज्याच्या 5,340 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी आहेत.

त्यापाठोपाठ कॅनरा बँक 4,558 कोटी रुपये आणि त्यानंतर बँक ऑफ बडोदाकडे 3,904 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी आहेत.

टॅग्स :BankrbiSBIRBI governor