RBIची बजाज फायनान्सवर मोठी कारवाई; कर्ज वितरणावर घातली बंदी, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Bajaj Finance: बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण
RBI stops Bajaj Finance from issuing loans under eCOM, Insta EMI Card with immediate effect
RBI stops Bajaj Finance from issuing loans under eCOM, Insta EMI Card with immediate effect Sakal

Bajaj Finance: जर तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेंट्रल रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या eCOM आणि Insta EMI कार्डला कर्ज मंजूर करणे आणि कर्ज वितरण करण्यावर बंदी घातली आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 45L (1) (B) अंतर्गत, बजाज फायनान्स लिमिटेडला कर्ज मंजूरी आणि वितरण थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता eCOM आणि Insta EMI कार्ड वरुन कर्ज मिळणार नाही.

रिझर्व्ह बँकेचा हा आदेश 'इकॉम' आणि 'इन्स्टा ईएमआय कार्ड' या बजाज फायनान्सच्या दोन कर्ज उत्पादनांना लागू होईल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन केले नाही.

RBI stops Bajaj Finance from issuing loans under eCOM, Insta EMI Card with immediate effect
One Nation One Product : देशातील 1,037 रेल्वे स्थानकांवर पोहोचली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' योजना; काय होतोय फायदा?

अलीकडेच RBIने बँका आणि NBFC साठी IT गव्हर्नन्स आणि नियंत्रणाशी संबंधित सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयटी गव्हर्नन्समध्ये जोखीम व्यवस्थापनासह इतर व्यवस्थापनाचा समावेश होतो.

या संदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वे, 2023 जारी करण्यात आली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.

बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण

आरबीआयचा हा आदेश शेअर बाजार बंद झाल्यानंतर आला आहे, मात्र आजच्या ट्रेडिंग सत्रात बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज बजाज फायनान्सचा शेअर 3.93 टक्क्यांनी घसरून 6940 रुपयांच्या पातळीवर आला आहे.

RBI stops Bajaj Finance from issuing loans under eCOM, Insta EMI Card with immediate effect
TCS ने पाठवली 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोटीस, कर्मचाऱ्यांची थेट सरकारकडे तक्रार, काय आहे प्रकरण?

बजाज फायनान्स ही देशातील आघाडीची NBFC कंपनी आहे. कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढून 3,551 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 26 टक्क्यांनी वाढून 8,845 कोटी रुपये झाले आहे. कंपनीचा शेअर सध्या 6,940 च्या पातळीवर आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी दोन टक्क्यांची घसरण झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com