Unclaimed Bank Deposits : जुन्या बंद पडलेल्या बँक खात्यात पैसे विसरलात? 'या' सोप्या पद्धतीने पुन्हा मिळेल रक्कम; RBI ची नवी डिजिटल सुविधा

RBI Rules : अनेक लोकांना जुन्या बँक खात्यांचा विसर पडतो. निष्क्रिय असलेली खाती ‘पूर्णपणे निष्क्रिय’ ठरवून त्यातील रक्कम RBI च्या DEA निधीत जमा केली जाते. ही रक्कम कायमची हरवत नाही; योग्य प्रक्रियेद्वारे ती परत मिळवता येते.
Unclaimed Bank Deposits

Users checking unclaimed bank deposits

esakal

Updated on

What Happens to Inactive Bank Accounts After 10 Years? : नोकरी बदलल्यानंतर, दुसऱ्या शहरात स्थलांतरानंतर किंवा योग्य नोंदी न ठेवल्यामुळे लोकांना अनेकदा त्यांच्या जुन्या बँक खात्यांचा विसर पडतो. त्यांची कष्टाची कमाई या खात्यांमध्ये तशीच पडून राहते. बँकिंग नियमांनुसार, जर एखादे खाते सलग १० वर्षे निष्क्रिय राहिले, तर त्याचे वर्गीकरण 'पूर्णपणे निष्क्रिय' खाते म्हणून केले जाते. त्यानंतर त्या खात्यातील शिल्लक रक्कम आरबीआयच्या (RBI) 'ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता' (DEA) निधीमध्ये हस्तांतरित केली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com