
जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
2026 नंतर कर्ज मिळणं सोपं राहणार नाही.
वेळेत कर्ज फेडणं, क्रेडिट स्कोर सुधारणं आणि आर्थिक साक्षरता वाढवणं हे गरजेचं आहे.
RBI Bank Loan: भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये एक ऐतिहासिक व निर्णायक बदल घडणार आहे. हा बदल केवळ बँकांच्याच नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवरही खोलवर परिणाम करणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच 'ECL' म्हणजेच Expected Credit Loss या नव्या मॉडेलवर मार्गदर्शक तत्वं जाहीर करणार आहे. ही नवी प्रणाली 1 एप्रिल 2026 पासून देशभरातील सर्व बँकांमध्ये लागू होणार आहे.