
Reliance Jio Subscription IPL: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ कंपनीने म्हटले आहे की जिओ सिम वापरणाऱ्या किंवा नवीन सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे न खर्च करता 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार पाहण्याची संधी मिळेल.
कंपनी मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर मोफत हॉटस्टार सुविधा देत आहे. याशिवाय कंपनीने JioFiber किंवा AirFiber चे 50 दिवसांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले आहे.