Renuka Jagtiani: पती चालवायचे कॅब, पत्नीने उभारली 39 हजार कोटींची कंपनी; असा आहे संघर्षाचा प्रवास

Renuka Jagtiani: 21 देशांमध्ये केला व्यवसायाचा विस्तार
renuka jagtiani new indian richest entrant in forbes 100 list 2023 her late husband was a cab driver
renuka jagtiani new indian richest entrant in forbes 100 list 2023 her late husband was a cab driver Sakal

Renuka Jagtiani: फोर्ब्सच्या नुकत्याच जाहीर झालेल्या टॉप 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानींनी भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय चलनात हे 7.65 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

टॉप 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीत अनेक नवीन नावे जोडली गेली आहेत. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. असेच एक नाव आहे रेणुका जगतियानी. रेणुका यांचे पती कॅब ड्रायव्हर होते आणि आज या कुटुंबाचा भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये समावेश आहे.

भारतीय श्रीमंतांच्या यादीत रेणुका जगतियानी 44व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 39,921 कोटी रुपये आहे. रेणुका जगतियानी यांचा फोर्बच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

(Renuka Jagtiani, new Forbes list entrant with Rs 39,921 crore wealth)

पती लंडनच्या रस्त्यावर कॅब चालवायचे

रेणुका यांनी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला आहे. रेणुका यांचे पती दिवंगत मिकी जगतियानी एकेकाळी रस्त्यावर कॅब चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. रिपोर्ट्सनुसार, मिकी 1970 च्या दशकात लंडनमध्ये कॅब ड्रायव्हर होते आणि तेथून ते प्रथम बहरीन आणि नंतर दुबईला गेले आणि त्यांनी मोठा व्यवसाय उभा केला.

मिकी जगतियानी 1973 मध्ये त्यांची आई-वडील आणि भावाच्या आकस्मिक निधनानंतर बहरीनला गेले, जिथे त्यांनी आपल्या भावाचे खेळण्यांचे दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास एक दशक मुलांसाठी खेळण्यांचे दुकान चालवले.

दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या खेळण्यांचे आऊटलेट्स देखील वाढवले ​​आणि 10 वर्षांत 6 खेळण्यांची दुकाने सुरू केली. यानंतर आखाती युद्ध संपल्यानंतर, ते दुबईला पोहोचले आणि तिथे त्यांचा लँडमार्क ग्रुप सुरू केला.

renuka jagtiani new indian richest entrant in forbes 100 list 2023 her late husband was a cab driver
Tata Motors: IPO लाँच होण्यापूर्वीच, टाटा मोटर्सने विकला टाटा टेक्नॉलॉजी मधील 9.9% हिस्सा, 'इतके' कोटी मिळणार

पतीच्या निधनानंतर व्यवसायात एंट्री

लँडमार्क ग्रुपच्या माध्यमातून मिकी जगतियानी यांनी मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि हॉटेल व्यवसाय वाढवला. पतीच्या निधनानंतर, रेणुका जगतियानी यांनी व्यवसाय हाती घेतला आणि 1993 मध्ये लँडमार्क ग्रुपमध्ये प्रवेश केला.

तीन मुलांची आई रेणुका यांना वारसाहक्काने 4.8 अब्ज डॉलक संपत्ती मिळाली आहे. आता रेणुका जगतियानी या समूहाच्या अध्यक्षा असून आरती, निशा आणि राहुल या तिन्ही मुलांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.

renuka jagtiani new indian richest entrant in forbes 100 list 2023 her late husband was a cab driver
Layoff: गेल्या 2 वर्षांत दर तासाला 23 कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी, भविष्यात होणार आणखी कर्मचारी कपात

21 देशांमध्ये व्यवसायाचा विस्तार

रेणुका यांनी लँडमार्क ग्रुपचा ताबा घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला आणि आज जगातील 21 देशांमध्ये कंपनीचे 2,200 हून अधिक स्टोअर्स आहेत. दुबईत पतीकडून मिळालेला व्यवसाय भारतात पुढे नेण्यातही रेणुका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

फोर्ब्सच्या मते, त्यांनी 1999 मध्ये लँडमार्क ग्रुपचा भारतीय व्यवसाय सुरू केला आणि आता कंपनीची देशात 900 हून अधिक स्टोअर्स आहेत. यासोबतच लँडमार्क ग्रुपचा हॉटेल व्यवसायही वेगाने प्रगती करत असून रेणुका यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com