Food Inflation: सर्वसामान्यांना मोठा झटका! महागाईने गाठला कळस; खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

Inflation Rise: महागाई पुन्हा वाढू लागली आहे. आधी दूध महाग झाले, नंतर टोलचे दर वाढले आणि आता फळे आणि भाज्या महाग झाल्या आहे. गेल्या महिनाभरात स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.
Food Inflation
Food InflationSakal

Inflation Rise: महागाई पुन्हा वाढू लागली आहे. आधी दूध महाग झाले, नंतर टोलचे दर वाढले आणि आता फळे आणि भाज्या महाग झाल्या आहे. गेल्या महिनाभरात स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. खाद्यतेल असो, कांदा असो की टोमॅटो, सर्वांच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन तेल असो की मोहरी, सर्वांच्या भावात महिनाभरात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तेल, कांदा, टोमॅटो महागल्याने डाळ फ्राय, पराठे बनवणे किंवा कोशिंबीर खाणेही महाग झाले आहे. महिनाभरात तेलाच्या दरात 15 टक्क्यांनी मोठी वाढ झाली असून, कांदा आणि टोमॅटोच्या दरानेही 50 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. इतकेच नाही तर सर्वसामान्यांची दैनंदिन गरज असलेल्या बटाट्याच्या दरातही वाढ झाली आहे.

Food Inflation
Narendra Modi 3.0: शपथ घेताच मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; 'या' 5 कामांवर लक्ष केंद्रित करणार

खाद्यपदार्थ आणि विशेषतः फळे आणि भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे मे 2024 मध्ये किरकोळ महागाई पुन्हा एकदा 5.14 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. असे झाल्यास डिसेंबर 2023 नंतरचा हा पाच महिन्यांचा उच्चांक असेल. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.69 टक्के होता. एप्रिलमध्ये महागाई दर 4.83 टक्क्यांच्या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या मते, देशातील अनेक भागांमध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम भाजीपाला आणि फळांवर झाला आहे. यामुळे मे महिन्यात अन्नधान्य महागाई 9.1 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, जी एप्रिलमध्ये 8.7 टक्के होती. त्याचा परिणाम एकूण महागाईवर दिसून येतो. सरकार बुधवारी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करू शकते. मुख्य महागाई (अन्न आणि ऊर्जा वगळता) मे महिन्यात 3.3 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

Food Inflation
Tax Devolution: मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर सर्वाधिक पैसे यूपी-बिहारला; मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला कमी रक्कम!

फळे आणि भाजीपाल्याचे दर वाढले

CMIE च्या मते, फळे आणि भाज्यांच्या महागाई दरात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे फळांची महागाई एप्रिलमधील 3.5 टक्क्यांवरून मे महिन्यात 5.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. गेल्या महिन्यात फळांच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com