Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki
Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki Sakal

Robert Kiyosaki: तीन महिन्यात 5 पट वाढेल पैसा? रॉबर्ट कियोसाकी म्हणाला, 'सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करा'

Robert Kiyosaki: लवकर श्रीमंत होण्यासाठी, लोक सहसा स्टॉक मार्केट, बाँड्स आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतात. पण 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट टी कियोसाकी यांचे म्हणणे वेगळेच आहे. त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, बिटकॉइन, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करा.

Robert Kiyosaki: लवकर श्रीमंत होण्यासाठी, लोक सहसा स्टॉक मार्केट, बाँड्स आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतात. पण 'रिच डॅड पुअर डॅड'चा लेखक रॉबर्ट टी कियोसाकी याचे म्हणणे वेगळेच आहे. त्याने पुन्हा एकदा सांगितले की, बिटकॉइन, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करा.

रॉबर्ट कियोसाकी म्हणाला की, काही दिवसांत बिटकॉइनच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत, बिटकॉइनच्या किमती त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर असतील. बिटकॉइन ऑगस्ट 2024 पर्यंत 3,50,000 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात. अशी भविष्यवाणी त्याने केली आहे.

3 महिन्यात 5 पट वाढणार पैसा?

रॉबर्ट कियोसाकीचा अंदाज बघितला तर अवघ्या तीन महिन्यांत बिटकॉइनची किमत 5 पट होईल. रॉबर्ट कियोसाकीला विश्वास आहे की, बिटकॉइनची सध्याची किमत 70,654.44 डॉलर वरून 5 पटीने वाढू शकते आणि ऑगस्ट 2024 मध्ये ती 3,50,000 डॉलर पर्यंत पोहोचू शकते.

गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला?

तो पुढे म्हणाला की, मी अधिकाधिक बिटकॉइन, इथरियम आणि सोलाना खरेदी करत राहतो कारण मला खात्री आहे की त्यांच्या किमती वाढतच जातील. कियोसाकी म्हणाला, 'अधिक सोने, चांदी, बिटकॉइन, सोलाना आणि इथरियम खरेदी करा.'

Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki
Veg Thali Price: शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?

रॉबर्ट टी. कियोसाकी याने यापूर्वी अनेकदा सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. विशेषतः चांदीच्या बाबतीत, कियोसाकीने गेल्या वर्षी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, शक्य तितकी चांदी खरेदी करा. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, जर तुम्हाला श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर चांदी खरेदी करा.

3 ते 5 वर्षांसाठी चांदीचा भाव 20 डॉलरवर राहील आणि आगामी काळात तो 100 डॉलर वरून 500 डॉलरवर जाईल, असा अंदाज त्याने वर्तवला होता. 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितले की प्रत्येकजण ते विकत घेऊ शकतो, अगदी गरीब देखील चांदी खरेदी करू शकतात. त्यामुळे आताच चांदीत गुंतवणूक करा.

Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki
RBI MPC: कर्जाचा EMI कमी झाली की वाढला? रिझर्व्ह बँकेने केली मोठी घोषणा

नोंद - सोने, चांदी, बिटकॉईन, क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com