
सोनं, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी भरघोस नफा कमावला, तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तोटा झाला.
रॉबर्ट कियोसाकी यांनी सल्ला दिला की बाजार क्रॅश झाले किंवा दर घसरले, तर खरेदीची हीच सर्वोत्तम संधी असते.
योग्य वेळ आणि संयमाने केलेली गुंतवणूक दीर्घकाळात प्रचंड नफा देऊ शकते.
Robert Kiyosaki: भारतीय आणि जागतिक शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत मोठे चढ-उतार सुरू आहेत. गुंतवणूकदारांना शेअर बाजारात तोटा सहन करावा लागत असला तरी सोनं, चांदी आणि बिटकॉइनमध्ये (Bitcoin) गुंतवणूक करणारे मात्र भरघोस नफा कमावत आहेत. ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे.