
10 Rupee Coin
Sakal
10 Rupee Coin: दुकानातून खरेदी केल्यानंतर तुम्ही ₹10 चं नाणं दुकानदाराला दिलं आणि तो तुम्हाला म्हणाला की, "साहेब, हे नाणं चालत नाही, दुसरं द्या," अशी घटना तुमच्यासोबत नक्कीच घडली असेल. गेल्या काही वर्षांपासून ₹10 च्या नाण्याभोवती असा गोंधळ निर्माण झाला आहे की अनेक व्यापारी आणि सामान्य लोक हे नाणं स्वीकारायला तयार नसतात. कोणतं नाणं खरं आणि कोणतं नकली, हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. पण खरंच या नाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे का? यामागचं सत्य नेमकं काय आहे, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.