
Rule No. 72 हा एक सोपा फॉर्म्युला आहे ज्यातून तुमचे पैसे किती वेळात दुप्पट होतील हे समजते.
72 ला व्याजदराने भागले की साधारण किती वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल याचा अंदाज येतो.
हा नियम फिक्स्ड डिपॉझिट, PPF, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, तसेच महागाई आणि GDP वरही लागू होतो.
What is Rule No. 72: गुंतवणूकदारांना नेहमी वाटतं की, आपला पैसा सुरक्षित राहावा आणि तो सातत्याने वाढत जावा. मुलांच्या शिक्षणासाठी फंड तयार करायचा असो, निवृत्तीचं नियोजन करायचं असो किंवा स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असो, प्रत्येकाला आपले पैसे दुप्पट व्हावेत अशी अपेक्षा असते. पण प्रश्न असा आहे की, किती वेळात पैसा दुप्पट होऊ शकतात? याचं उत्तर आहे Rule No. 72 या फॉर्म्युल्यात.