Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Russia-Ukraine Impact on Diesel Supply: युक्रेनकडून रशियाच्या ऑइल रिफायनरींवर सातत्याने हल्ले होत असल्याने डिझेल उत्पादन आणि पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. अमेरिकेतही डिझेलच्या दरात वाढ झाल्याने या संकटाचा भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Russia-Ukraine War Impact On Petrol-Diesel

Ukraine Strikes Russian Oil Refineries, Diesel Shortage Worsens; Will Petrol-Diesel Prices Rise in India?

eSakal

Updated on

India petrol price global oil crisis: अमेरिका-इराण संघर्षासोबतच आता पुन्हा रशिया-युक्रेन युद्ध पेटले आहे. युक्रेनकडून रशियातील ऑइल रिफायनरीवर सातत्याने ड्रोन हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांचा परिणाम आता केवळ रशियापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचा फटका जागतिक इंधन बाजारालाही बसताना दिसत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियातील सहापैकी तीन मोठ्या डिझेल निर्मिती करणाऱ्या रिफायनरींनी उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे किंवा काही ठिकाणी उत्पादन पूर्णपणे थांबले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com