
रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे. रशियाच्या दूतावासाने भारताला 5% सवलतीत कच्चं तेल पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर्षी नवी दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती रशियन दूतावासातील अधिकाऱ्याने बुधवारी दिली. या भेटीच्या तारखा अद्याप निश्चित होत असून, दोन्ही देश व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी आणि पेमेंट यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.