
JSW Steel World’s Most Valuable Company: सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी JSW स्टील ही जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे. मंगळवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 1,074.15 रुपयांवर पोहोचली आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक सुमारे 11 टक्के आणि मागील एका आठवड्यात 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.