
CBDT च्या नव्या नियमांनुसार पगारदारांसाठी पर्क्सवर करमाफीची मर्यादा 50 हजारांवरून थेट 4 लाखांपर्यंत वाढली.
परदेशी वैद्यकीय उपचारासाठी करमुक्त मर्यादा 2 लाखांवरून 8 लाखांपर्यंत वाढवण्यात आली.
यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना थेट कराचा दिलासा मिळणार आहे.
Big Tax Relief for Employees: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवे नोटिफिकेशन जाहीर केले असून लाखो पगारदार करदात्यांना यामुळे थेट दिलासा मिळणार आहे. आयकर नियम, 1962 मध्ये दोन नवे नियम 3C आणि 3D जोडण्यात आले असून हे बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू झाले आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम मूल्यांकन वर्ष 2026-27 पासून दिसेल.