
पोस्ट ऑफिस अंतर्गत चालणारी ही योजना मुलींसाठी आहे.
10 वर्षांखालील मुलींसाठी खाती उघडता येतात.
यामध्ये दरवर्षी ₹250 ते ₹1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते.
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. सुरक्षित परतावा आणि करसवलतीचा लाभ मिळवायचा असेल, तर सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. मुलीच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या या योजनेत तब्बल 8.2 टक्के व्याजदर लागू आहे आणि ही संपूर्ण योजना टॅक्स फ्री आहे.