SBI Sovereign Gold Bond : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये स्वस्तात खरेदी करू शकता सोने; काय आहे योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sovereign Gold Bond scheme opens today: Things you need to know; check price, limit

SBI Sovereign Gold Bond : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये स्वस्तात खरेदी करू शकता सोने; काय आहे योजना

SBI Sovereign Gold Bond : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्त सोने खरेदी करू शकता. तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक खास ऑफर मिळत आहे.

6 मार्चपासून म्हणजे उद्यापासून स्वस्त सोने खरेदी करू शकता. एसबीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 10 ग्रॅम सोने किती रुपयांना मिळत आहे. हे जाणून घ्या.

एसबीआयने ट्विट केले आहे :

स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की सॉवरेन गोल्ड बाँड्ससह तुमच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि सुरक्षितता मिळवा. यासोबत SBI ने तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक का करावी अशी 6 कारणे दिली आहेत-

6 मोठे फायदे कोणते?

  • यामध्ये तुम्हाला खात्रीशीर परताव्याची सुविधा मिळेल. सॉवरेन गोल्ड बाँड गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5% दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर दिले जाईल.

  • भांडवली नफा करातून दिलासा मिळेल.

  • सोन्याचा हा प्रकार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही अडचण नाही.

  • यासोबतच कोणताही जीएसटी आणि मेकिंग चार्ज भरावा लागणार नाही.

  • SGB थेट तुमच्या डिमॅट खात्यात येईल

  • कर्ज सुविधेसाठीही वापरता येईल

  • 10 ग्रॅम सोने किती रुपयांना आहे?

  • या योजनेंतर्गत 6 ते 10 मार्चपर्यंत स्वस्त सोने उपलब्ध होणार आहे. यासाठी इश्यूची किंमत 5,611 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे.

सॉवरेन गोल्ड बाँड कोठे खरेदी करू शकतो?

स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) मधून खरेदी करता येईल.

किती वर्षांनी म्यॅच्युरिटी आहे?

सॉवरेन गोल्ड बाँडची म्यॅच्युरिटी 8 वर्षे आहे. परंतु पाच वर्षांनंतर, पुढील व्याज भरण्याच्या तारखेला, तुम्ही या योजनेतून बाहेरही पडू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदाराने किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास, गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बाँडवरही कर्ज घेऊ शकतो, परंतु सुवर्ण रोखे तारण ठेवावे लागतील.

टॅग्स :goldSBIInvestment