Gold Silver Price : होळी येताच सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

मात्र आज पुन्हा होळी तोंडावर असताना सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.
Gold Silver Price
Gold Silver Pricesakal

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. शनिवारी सोन्याचे दर स्थिर होते तर चांदी महागली होती मात्र आज पुन्हा होळी तोंडावर असताना सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,550 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 699 रूपये आहे. (Gold Silver Price update 5 March 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 57,280 रुपये

दिल्ली - 56,550 रुपये

हैदराबाद - 56,550 रुपये

कोलकत्ता - 56,550 रुपये

लखनऊ - 56,550 रुपये

मुंबई - 56,550 रुपये

नागपूर - 57,820 रुपये

पुणे - 56,550 रुपये

Gold Silver Price
Vedanta Shares मध्ये तेजी, कर्ज कमी करण्याच्या दृष्टीने हालचाल...

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Price
Gold Silver Price : वीकेंडला एवढं सोनं-चांदी महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com