SEBI Warning: 'जास्त रिटर्न मिळवण्याच्या नादात...', सेबीने गुंतवणूकदारांना दिला गंभीर इशारा

SEBI Warning: लहान गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या अल्गो सेलर्सवर अंकुश ठेवण्याचा SEBI प्रयत्न करत आहे. तसेच बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा इशारा सेबीने दिला आहे.
Sebi cautions investors against unregistered entities promising assured returns
Sebi cautions investors against unregistered entities promising assured returnsSakal

SEBI Warning: लहान गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या अल्गो सेलर्सवर अंकुश ठेवण्याचा SEBI प्रयत्न करत आहे. तसेच बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा इशारा सेबीने दिला आहे. गुंतवणूकदारांनी यापासून दूर राहावे असा सल्ला सेबीने दिला आहे.

सेबीने म्हटले आहे की, जास्त परताव्यामुळे पैसे गमावण्याचा धोका जास्त असतो. असे दावे करणाऱ्या कंपन्या अनेकदा लोकांची फसवणूक करतात. याशिवाय या कंपन्यांनी लोकांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे.

सेबीच्या म्हणण्यानुसार, सिक्युरिटी मार्केटमध्ये निश्चित परताव्याची हमी देता येत नाही. SEBI ने ऑगस्ट 2023 मध्ये कंपन्यांची तपासणी करण्यासाठी एजन्सी तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता.

सेबीकडे नोंदणीकृत कंपन्यांमध्येच पैसे गुंतवा

सेबीने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घेण्यास सांगितले आहे. तुमचे पैसे हुशारीने गुंतवा. सेबीकडील नोंदणीकृत कंपन्यांमध्येच पैसे गुंतवा. कंपन्यांच्या खात्रीशीर आणि जास्त परताव्याच्या खोट्या दाव्यांना बळी पडू नका. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास गुंतवणूकदार आर्थिक नुकसान आणि फसवणूक टाळू शकतात.

Sebi cautions investors against unregistered entities promising assured returns
Sebi: गुंतवणूकदारांची होतेय फसवणूक? IPO आणण्यासाठी कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन; काय आहे प्रकरण?

सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून अशा बनावट कंपन्या आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म लोकांची फसवणूक करत असल्याचे सेबीला आढळून आले आहे. एकदा त्यांनी विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणूकदारांना जास्त आणि खात्रीशीर परताव्याची हमी देतात. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्यावर तुमचे पैसे गुंतवू नका, असा सल्ला सेबीने दिला आहे.

Sebi cautions investors against unregistered entities promising assured returns
Reliance Industries: रिलायन्सने रचला इतिहास, 20 लाख कोटींचा टप्पा पार करणारी पहिली कंपनी; कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com