Reliance Industries: रिलायन्सने रचला इतिहास, 20 लाख कोटींचा टप्पा पार करणारी पहिली कंपनी; कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

Reliance Industries: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. भारतीय शेअर बाजारातील ही पहिली कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Reliance Industries hits market capitalisation of rs 20 lakh crore; stock at record high
Reliance Industries hits market capitalisation of rs 20 lakh crore; stock at record highSakal

Reliance Industries: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. भारतीय शेअर बाजारातील ही पहिली कंपनी आहे जिचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बीएसईवर 1.89 टक्क्यांच्या वाढीसह कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 45.30 अंकांच्या वाढीसह 2,950.00 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. (Reliance Industries hits market capitalisation of rs 20 lakh crore; stock at record high)

गेल्या दोन आठवड्यात शेअर्समध्ये मोठी वाढ

गेल्या दोन आठवड्यांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या वाढीनंतर कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 29 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या मार्केट कॅपने 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सुमारे 14 टक्क्यांनी वाढले आहेत. (Mukesh Ambani-led Reliance Industries is now the first Indian stock to cross Rs 20 lakh crore market cap)

Reliance Industries hits market capitalisation of rs 20 lakh crore; stock at record high
Unemployment Rate: आनंदाची बातमी! शहरी बेरोजगारीचा दर 5 वर्षांच्या नीचांकावर; काय आहे कारण?

2005 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपये होते. तर 2019 मध्ये रिलायन्सचे बाजार भांडवल 10 लाख कोटी रुपये होते.

20 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह, रिलायन्स इंडस्ट्रीज आता देशातील सर्वोच्च कंपनी बनली आहे. टीसीएस दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 10.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Reliance Industries hits market capitalisation of rs 20 lakh crore; stock at record high
Upcoming IPO: कंपनी IPO मधून उभारणार 500 कोटी; सेबीकडे कागदपत्रे सादर, जाणून घ्या संपूर्ण तपशील

सर्वात जास्त मार्केट कॅप असणाऱ्या 10 कंपन्या

  • रिलायन्स इंडस्ट्रीज: 20,01,155 कोटी

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 15,08,261 कोटी

  • HDFC बँक: 10,56,504 कोटी

  • ICICI बँक: 7,09,254 कोटी

  • इन्फोसिस: 6,94,433 कोटी

  • LIC: 6,30,444 कोटी

  • SBI: 6,30,390 कोटी

  • भारती एअरटेल: 6,26,626 कोटी

  • HUL: 5,62,880 कोटी

  • ITC: 5,05,966 कोटी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com