SEBI: सेबीची मोठी कारवाई! 8 कंपन्यांच्या मालमत्तांचा करणार लिलाव; काय आहे प्रकरण?

SEBI: सेबीने 30 जानेवारीला विबग्योर ग्रुप ऑफ कंपनीज, पेलॉन ग्रुप ऑफ कंपनीजसह 8 कंपन्यांच्या 16 मालमत्तांचा लिलाव करणार आहे. गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे गोळा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सेबीने ही कारवाई केली आहे.
Sebi to auction 16 properties of eight companies on January 30
Sebi to auction 16 properties of eight companies on January 30 Sakal

SEBI: सेबीने 30 जानेवारीला विबग्योर ग्रुप ऑफ कंपनीज, पेलॉन ग्रुप ऑफ कंपनीजसह 8 कंपन्यांच्या 16 मालमत्तांचा लिलाव करणार आहे. गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे गोळा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सेबीने ही कारवाई केली आहे.

कोलकाता वेअर इंडस्ट्रीज, टॉवर इन्फोटेक ग्रुप, जीबीसी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ग्रुप, टीचर्स वेल्फेअर क्रेडिट अँड होल्डिंग ग्रुप, हॅनिमन हर्बल ग्रुप आणि अॅनेक्स इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपन्यांच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेबीने कंपन्यांच्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती शैलेंद्र प्रसाद तालुकदार यांची कंपन्यांच्या संपत्तीचे लिक्विडेशन आणि गुंतवणूकदारांना पेमेंट करण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

Sebi to auction 16 properties of eight companies on January 30
Narayana Murthy: सुधा यांना कंपनीबाहेर ठेवणे ही माझी चूकच; नारायण मूर्ती यांची मुलाखतीदरम्यान कबुली

किती मालमत्तांचा लिलाव होत आहे?

16 मालमत्तांपैकी 5 विबग्योर ग्रुपची, 3 टॉवर इन्फोटेकची, 2 पेलॉन ग्रुपची, 2 जीबीसी इंडस्ट्रियल कॉर्पची, 1 कोलकाता वेअर इंडस्ट्रीजची, 1 टीचर्स वेलफेअर क्रेडिट आणि होल्डिंग ग्रुपची, 1 हॅनेमन हर्बल ग्रुपची आणि 1 अॅनेक्सची आहे.

सेबीने बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेचे खटले, मालकी हक्क आणि दाव्यांची स्वतंत्र चौकशी करण्यास सांगितले आहे.

Sebi to auction 16 properties of eight companies on January 30
RBI 2000 Note: 2,000 रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिसमधूनही बदलता येणार; आरबीआयने दिली माहिती

सेबीच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांनी नियमांचे पालन न करता गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले होते. त्यामुळे सेबीने कंपन्यांवर कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा लिलाव ऑनलाइन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com