
Second Installment Of Advance Tax Due Today Check Rules Before Payment
Esakal
करदात्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील अॅडव्हान्स टॅक्सचा हफ्ता आज भरायचा आहे. ज्यांचा कर वर्षाला १० हजार रुपयांपेक्षा जास्त सतो त्यांना अॅडव्हान्स टॅक्स हफ्त्यांमध्ये भरणं आवश्यक असतं. त्यानुसार वर्षातला दुसरा हफ्ता भरण्याची तारीख आज आहे. यामुळे सरकारला वर्षभरात कर जमा करण्यासाठी मदत होते. तसंच करदात्यांनाही एकरकमी मोठी रक्कम भरण्याऐवजी वर्षभर हफ्त्यात रक्कम देणं सोपं जातं. यामुळे आर्थिक भारही अचानक येत नाही.