

Senior Citizens FD Rates: Which Bank Offers the Highest Interest in 2026? Check Now!
eSakal
Senior Citizens FD: आपण तरुण असताना शेअर बाजारात गुंतवणूक करून आपण जोखीम घेऊ शकतो. परंतु वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर आपल्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची असते. सेवानिवृत्तीनंतर, आपले उत्पन्नाचे स्रोत कमी होतात, त्यामुळे आपल्याला आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात जिथे प्रत्येक महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी खात्रीशीर परतावा मिळेल. भारतात बँक मुदत ठेवी म्हणजेच FD खूप लोकप्रिय आहेत, कारण यात पैसे गमावण्याची भीती खूपच कमी असते आणि चांगला रिटर्न देखील मिळतो.