नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. पण ऑटो क्षेत्रात तेजीचं वातावरण आहे. मंगळवारी दिवसाची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून येतेय. मारुती, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प निफ्टी टॉप गेनर्स शेअर्स आहेत. तर बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक २२५ अंकांनी घसरून ८१९३४ वर पोहोचला आहे. तर एनएसई ५० स्टॉक्सचा इंडेक्स ७६ अंकांच्या घसरणीसह २५१२५वर आहे.